Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार यांच्या कामांचा पुन्हा झपाटा

0

बल्लारपूर विधानसभेतून निवडणूक लढवणार?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून पराभूत झाल्यांनतर, अजिबात खचून न जाता सुधीर मुनगंटीवार यांनी आपला कामांचा झपाटा पुन्हा सुरू केला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळापसून तर राज्य भरातील दौऱ्यांपर्यत आणि मतदारसंघातील कामांचा आढावा घेण्यापासून तर अधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्यापर्यंत…सारी कामे पूर्वीसारखी सुरू झाली आहेत. जिंकलं तर माजायचं नाही, हरलं तर लाजायचं नाही, ही पहिल्या दिवसापासून दिलेली घोषणा, सुधीर मुनगंटीवार, प्रत्यक्षात आचरणात आणत असल्याने, एक आगळे उदाहरण त्यांच्या स्वरुपात निर्माण झाले आहे. (Sudhir Mungantiwar contest elections from Ballarpur Assembly)

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच, सुधीर मुनगंटीवार पुन्हा सक्रीय झाले असून, विविध बैठकी आणि विकासकामांचा आढावा घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ते बल्लारपूर विधानसभेतून निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे.

इच्छा नसताना फक्त पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे सुधीर मुगगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक लढविली. मात्र, यात यश आले नाही. जिंकले तर माजायचे नाही आणि हरलं तर लाजणार नाही, असा निश्चय घेऊन ते पुन्हा कामाला लागले आहेत. निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या अनेक कामांची पाहणीही त्यांनी या काळात केली आहे. (Sudhir Mungantiwar)

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने विधानसभा निवणूक लढवण्याची तयारी सुरु केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बल्लारपूर विधानसभा ते लढवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभेत काँग्रेसला 48,200 मताधिक्य मिळाले. पण लोकसभा आणि विधानसभेची गणितं वेगळी असतात. त्यामुळे आता विधानसभेत मोठ्या ताकदीने विजयश्री खेचून आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी 2019 मध्ये बल्लारपूर विधानसभा निवडणुक लढवली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे डॉ. विश्वास आनंदराव झाडे हे उमेदवार होते. तर वंचित बहुजन आघाडीकडून राजू झोडे हे उभे होते. या निवडणुकीत मुनगंटीवार यांना 86,002 मते मिळाली होती. तर झाडे यांना 52,762 मते मिळाली होती. 33,240 मतांनी मुनगंटीवार निवडून आले होते. 42.90 टक्के इतका त्यांच्या मताचा टक्का होता.