राजपूत समाजाचे सुधीर मुनगंटीवार यांना भक्कम पाठबळ

0

20 हजारावर बंधु-भगिनींनी दिला जाहीर पाठिंबा

*चंद्रपूर, 5 एप्रिल 2024 : सर्वसमावेश आणि चौफेर विकासाची मशाल घेऊन निघालेले राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना, मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरच्‍या राजपूत समाजाने समर्थन जाहीर केले आहे.*

 

चंद्रपूर व देशाच्‍या विकासाच्‍या संकल्‍पात आपले योगदान देण्‍यासाठी मतदारसंघातील 20 हजार राजपूत बंधू-भगिनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील, असा निर्धार राजपूत समाजाचे अध्‍यक्ष करणसिंह बैस, सचिव शुभमस‍िंग जनवार, कोषाध्‍यक्ष शशांक बैस, सहसचिव कलश बैस, उपाध्‍यक्ष अंकित चव्‍हाण, चंद्रपुर व्यापारी मंडलचे अध्यक्ष रामजीवन सिंग परमार,चेतनसिंह गौर,अमरसिंग राठोड, दशरथससिंह ठाकूर, अभयसिंग कछवां, अॅड. राजेश ठाकूर, जयसिंग गहेरवार, राजेंद्र सिंग बैस, राजेंद सिंग राठोड, संदीप बैस, विशाल गहेरवार, करणसिंग गहेरवार, संजयसिंग बैस, सुनील बैस, कुलविरस‍िंग राजपूत, प्रतापसिंग बैस, नलेश चव्‍हाण, हेमंत तोमर, अम‍ित बैस, पंकज दिक्ष‍ित, राज चंदेल, चेतन बैस, श्रेयांश ठाकूर, संदेश बैस, रणवीर गौतम, वैभवस‍िंग, जय ठाकूर, आशिष ठाकूर, पियूष ठाकूर, बंटी ठाकूर, विक्रम राठोड,अथर्व चौहान, शीला चौहाण, प्रतिमा ठाकूर, श्रुती ठाकूर, रुची कछवाह, दीपिका गहेरवार यांनी केला आहे.