


अक्षरा शेट्ये 97 टक्के गुणांसह शाळेतून पहिली
नागपूर(Nagpur), 27 मे गडचिरोली सारख्या आदिवासी क्षेत्रातून आलेल्या व सध्या स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेत(SDD HINDU GIRLS HIGH SCHOOL) शिकत
असलेल्या चार विद्यार्थिनींनी शालांत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
शाळेचा एकूण निकाल 91 टक्के लागला असून अक्षरा शेट्टे हिने 97% गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
शाळेतील एकुण 20 विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या असून गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीची प्रिया भेंडारकर हिने 80.80 टक्के, गडचिरोली जिल्ह्यातील दुधमाळा येथील हिना उसेंडी हिने 69.40 टक्के, गट्टेपायली येथील खुशी उसेंडी हिेने 69 टक्के, बोरी येथील तेजस्वी नेताम हिने 56.30 टक्के तर गाववेटीला येथील सारिका पोरटी हिने 53 टक्के गुण प्राप्त केले आहेत.
स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस(Ravindra Fadnavis)आणि कार्यकारिणी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.