नाते आपुलकीचे संस्थेतर्फे होतकरू विद्यार्थ्याला भरीव आर्थिक मदत

0

नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था ही संस्था नेहमीच गरजू रुग्ण व होतकरू हुशार विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. त्याच परंपरेला पुढे नेत संस्थेतर्फे पुन्हा एकदा एका होतकरू विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत करण्यात आली.

काऊश चक्रवती वनकर या होतकरू विद्यार्थ्याला 10 हजार आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. काऊशने दहावीला 84.20% आणि बारावीला 86% गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याचे वडील मजुरीचे काम करतात तर आई गृहिणी असून आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही तो सध्या नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये हेल्थ असिस्टंट पॅरामेडिकल कोर्ससह पदवी शिक्षण घेत आहे.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष किशन नागरकर, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, संस्था सदस्य प्रा. राजेश बारसागडे, सुमित जुनारकर, सौ. स्नेहा गडे, श्रीमती मुप्पीडवार मॅडम व जवादे मॅडम उपस्थित होते.

संस्थेने आतापर्यंत अनेक गरीब, गरजू रुग्ण आणि होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांना भरीव शैक्षणिक तसेच आर्थिक मदत करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे..