

तुम्ही माझे पूर्वीचे लेख वाचा आणि व्हिडीओ बघा त्यात मी बिघडलेल्या पुण्याविषयी सखोल सांगितले आहे जे नेमके पुन्हा एकवार त्या पोर्शे कार अपघातामुळे येथे आठवले आहे. पुणे म्हणजे केवळ राज्याचे नव्हे तर संपूर्ण भारताचे एक मुक्त शहर अगदी गोव्यापलीकडे आणि काळ्या पैशांचे माहेरघर जणू भारताची स्विस बँक. जे बेअक्कल मायबाप आहेत ज्यांना आपणहून आपली पुढली पिढी बिघडवायची असते असे मायबाप पोटच्या मुलांना पुणे शहरात विशेषतः शिकायला किंवा नोकरीनिमित्ते पाठवतात, आता भारतातही असे मायबाप देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत ज्यांना नवश्रीमंती आल्याने लोकांना लुबाडून आणि फसवून अमाप पैसे आल्याने पाश्चिमात्य संस्कृतीची हुबेहूब नक्कल करायची असल्याने असे असंख्य मायबाप आपल्या घडलेल्या मुलांना नोकरी आणि शिक्षणानिमित्ते आपणहून पुण्यात पाठवायचे असते आणि ते पाठवतात, पुढल्या वर्षभरात मग हि हुशार मुले पुण्यातल्या बिघडलेल्या आणि बिघडवणाऱ्या टोळक्यांचे सावज होतात आणि बघता बघता बिघडतात. नुकतीच वयात आलेली मुले व मुली ते थेट बुजुर्ग स्त्री पुरुष, साऱ्याच वयोगटातल्या व्यसनी बदमाश फसव्या लबाड नीच आणि लैंगिक विकृतीने पछाडलेल्या लोकांचे शहर गोवा नव्हे पुणे आहे आणि हेच नेमके वास्तव आहे….
अतिशय महत्वाचा मुद्दा आणि सल्ला असा कि जगातले भारतातले आणि राज्यातले बहुसंख्य तरुण वर्ग खास बिघडण्यासाठी काळा पैसा लुटण्यासाठी पुण्यात येतो म्हणून जे काय उरले सुरले काही संस्कारी सुसंस्कृत न बिघडलेले बोटावर मोजण्याएवढे मूळ पुणेकर त्या पुण्यात जर शिल्लक असतील तर त्यांनी नेमका असा निर्णय तातडीने घ्यावा कि जसे पुण्याबाहेरचे लोंढ्याने पुण्यात येतात, उरलेल्या चांगल्या पुणेकारांनी यापुढे आपल्या पुढल्या पिढीला तातडीने पुण्याबाहेर पाठवावे. पुण्यात राहण्याचा ठेवण्याचा मोह अजिबात धरू नये. ज्या पुण्यात कुटुंब संस्कृती पूर्णतः लोप पावलेली आहे म्हणजे भल्या पहाटेपासून तर रात्री खूप उशिरापर्यंत पुण्यातले जवळपास सारेच केवळ रस्त्यावर किंवा घराबाहेर असतात आणि त्यातले बहुतेक टोळक्याने आज आणखी किती बिघडायचे त्यावर विचार आणि कृती करतांना दिसतात. वेदांत विशाल अग्रवाल प्रकरण त्या अपघातामुळे उजेडात आलेले असले तरी असे असंख्य लोफर विशाल आणि वेदांत पद्धतीचे बिघडलेले व्यसनी बेधुंद मायबाप आणि मुले पुण्यातल्या घराघरात तुम्हाला आढळून येतील, ज्या पद्धतीची पाश्चिमात्य संस्कृती असते म्हणजे मुले केवळ सज्ञान होताच येथे बहुसंख्य पालक पोटच्या मुलांना पब संस्कृतीचे नेमके धडे गिरवताना हमखास दिसतात आणि तरुण झालेल्या मुलींना बाहेर पडतांना कंडोम सोबत घेतले का, अशी आठवण करून देणारी आई व्यक्तिगत आयुष्यात ती स्वतः देखील असेच निर्धास्त बेधुंद बेफाम आयुष्य जगत असते. आपल्या या राज्यातले असे कीतीतरी शासकीय अधिकारी आणि नेते आहेत ज्यांची हमखास बिघडलेली मुले तुम्हाला पुण्यात अगदी जागोजाग बघायला मिळतात…
ज्यांना बायकांचा नाद आहे ज्यांना बायकांवर पैसे लुटायचे आहेत हल्ली अशा नशेबाज विकृत लिंगपिसाट पुरुषांचा मुक्काम गोवा किंवा थायलंड पद्धतीच्या ठिकाणांऐवजी ऐवजी सहज पोहचू शकणाऱ्या पुण्यात असतो त्यातूनच आपल्या या देशात संख्यने सर्वाधिक पब्ज तुम्हाला पुण्यात पाहायला मिळतात ज्या पब्ज मधून किंवा पब्जच्या आसपास अगदी सहज ड्रग्स पेडलर्स घिरट्या मारताना दिसतात. आणि बहुसंख्य पब्ज मधून मिळणारी दारू हमखास नकली असते. कोणत्याही पब्ज मध्ये किमान तीनशेच्या वर ग्राहके दाटीवाटी करून बसलेले असतात आणि असे पब्ज दररोज काठोकाठ भरलेले असतात. पुण्यात राहणारा जो तो एकमेकांना लुटण्यात लुबाडण्यात आणि बिघडविण्यात हमखास व्यस्त असतो, चांगली कुटुंब व्यवस्था आता पुण्यात अभावाने पाहायला मिळते आणि दादागिरी गुंडगिरी तर येथे सतत सभोवताली वावरतांना दिसते. माझी त्या कुटुंबांना हात जोडून नम्र विनंती कि प्रसंगी तुम्ही पुढल्या पिढीला भलेही फार मोठे उच्च शिक्षण देऊ नका पण नोकरी आणि शिक्षणानिमित्ते निदान पुण्यात तरी त्यांना अजिबात पाठवू नका. आता पुण्यातल्या सोशल वर्कर्सला माझे आव्हान आणि आवाहन असे कि ज्या न्यायाधीशांनी वेदांत विशाल अग्रवाल यास तातडीने जामीन मंजूर केला ते न्यायधीश नेमके कोण आणि कसे त्यावर नक्की व नेमकी माहिती घ्या. त्या न्यायाधीशांना जाऊन सांगा कि आज अनिस आणि अश्विनी गेले उद्या हि वेळ तुमच्यावर देखिल येऊ शकते. मित्रांनो, काळे पैसे जमा करणाऱ्यांचा फक्त वक्त चांगला असतो मात्र अंत हमखास वाईट असतो. हाती आलेली धक्कादायक माहिती अशी कि ज्या पब मध्ये वेदांत आणि मित्र मद्यपान करीत बसले होते तेथेच अनिस आणि अश्विनी यांच्याशी त्यांनी तेथे नशेत आपणहून वाद निर्माण केला का, म्हणून बाहेर पडल्यानंतर वेदांतने जर या दोघांना पोर्शे कारने मुद्दाम आपणहून पाठलाग करून चिरडले असेल ठार केले असेल तर 302 कलम का लावल्या गेलेले नाही किंवा न्यायधिशानी वेदांत यास बाल सुधार गृहात न पाठवता तातडीने का म्हणून जामीन मंजूर केला ? अतिशय उद्दाम व उन्मत्त अशा राम अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यवसायिकाच्या नातवाला नेमके या अति गंभीर प्रकारणातून कोणी वाचविले आहे तो देखील तपास महत्वाचा आहे. जमिनीच्या फसव्या व्यवहारात सतत गुंतलेले पुण्यातले शासकीय प्रशासकीय पोलीस अधिकारी नेते दलाल आणि हे असे बांधकाम व्यवसायिक आणि त्यांच्या दिमतीला असलेले गुंड प्रवृत्तीचे तरुण, कायद्याचा धाक न उरलेल्या पुण्यात काहीही घडू शकते…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी