Patriotic songs :38 शाळांतील विद्यार्थ्‍यांनी सादर केली देशभक्‍तीपर गीते

0

खासदार चषक आंतरशालेय देशभक्‍ती समूहगीत स्पर्धेला उत्‍स्‍फूर्त प्रत‍िसाद
नागपूर (nagpur), 13 ऑगस्‍ट
बाल कला अकादमी व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खासदार चषक आंतरशालेय समूहगान स्पर्धेच्‍या प्राथमिक फेरीचा दुसरा टप्‍पा मंगळवारी सायंटिफिक सभागृहात पार पडला. वर्ग 6 ते 10 साठी झालेल्‍या ब गटासाठी या स्‍पर्धेत शहरातील एकुण ३८ शाळांच्‍या विद्यार्थ्‍यांनी सहभागी होत उत्‍स्‍फूर्त प्रत‍िसाद दिला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्‍हणून संस्‍कार भारतीच्‍या अध्‍यक्ष कांचन गडकरी (Kanchan Gadkari), सारंग गडकरी (Sarang Gadkari), स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस (Ravindra Fadnavis, President of Women’s Education Broadcasting Board), बाल कला अकादमीच्या अध्यक्ष मधुरा गडकरी (Bal Kala Academy President Madhura Gadkari), सचिव सुबोध आष्टीकर (Secretary Subodh Ashtikar), सदस्य सीमा फडणवीस यांची उपस्थिती होती.

शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्‍यांनी एकापेक्षा एक सरस देशभक्‍तीपर गीते सादर करून उपस्‍थ‍ितांची मने जिंकून घेतली. कांचन गडकरी यांनी विद्यार्थ्‍यांचे कौतुक केले. या स्‍पर्धेचे परीक्षक म्‍हणून शिरीष भालेराव, वंदना देवधर आणि रसिका करमाळेकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मीनल बाविस्कर यांनी केले. या दोन्‍ही गटातून निवडल्‍या गेलेल्‍या शाळांच्‍या चमूंची अंतिम फेरी येत्‍या, १७ ऑगस्ट रोजी सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होणार असून याच दिवशी पार‍ितोषिक वितरण समारंभ देखील आयोजित करण्‍यात आला आहे.