प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

रवी नगरमध्ये साजरा झाला सृजनशीलतेचा उत्सव

नागपूर (Nagpur) :- रवी नगर (प्रतिनिधी) – *“बाप्पा मोरया”*च्या जयघोषात आणि शाडू मातीच्या सुगंधात प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर येथे आंतरशालेय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची तीन दिवसीय स्पर्धा उत्साहात पार पडली. २० ऑगस्टला सुरुवात झालेल्या या उपक्रमाचा समारोप २२ ऑगस्ट रोजी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाने झाला.

या स्पर्धेत एकूण पंचवीस शाळांमधून आलेल्या तब्बल १५० विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. विद्यार्थ्यांनी शाडू माती, नैसर्गिक रंग, कापूस, नारळाच्या शेंडीसारख्या पर्यावरणास हितकारक वस्तूंचा वापर करून गणेशमूर्ती घडवल्या. बालहस्तकौशल्य, कल्पकता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला.

स्पर्धेचे परीक्षक श्री. किशोर सोनटक्के तसेच श्री. प्रफुल्ल माटेगावकर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सृजनशीलतेचे कौतुक करताना, या लहानशा हातांनी तयार केलेल्या मूर्ती केवळ सुंदरच नाहीत, तर त्या निसर्गप्रेमाचाही संदेश देतात, असे मत व्यक्त केले.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धेचे विजेते स्पर्धक
गट अ
प्रथम क्रमांक – शिवम दास (सरस्वती विद्यालय)

द्वितीय क्रमांक – काव्यांश धापूरकर (आकांक्षा फाउंडेशन)

तृतीय क्रमांक – खुशबू राठोड (बाबूबन एन.एम.सी)

प्रोत्साहनपर पुरस्कार – भाविका गेडाम (सरस्वती विद्यालय), शिवानी काईकडे (बाबूबन एन.एम.सी), आरणा लांडे (बी.के.व्ही.व्ही.)

गट ब
प्रथम क्रमांक – स्वरूप बांते (सोमलवार रामदास पेठ)

द्वितीय क्रमांक – सायली बिसेन (राही पब्लिक स्कूल)

तृतीय क्रमांक – पियुष बिंदरवार (सी.पी. अँड बेरार, रवी नगर)

प्रोत्साहनपर पुरस्कार – निधी गोसावी (बी.आर.ए. मुंडले), रुद्रनील चॅटर्जी (सोमलवार रामदास पेठ), होशिका वाडीभस्मे (प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर)

गट क
प्रथम क्रमांक – भावेश राऊत (हडस हायस्कूल)

द्वितीय क्रमांक – जावेल भगत (राही पब्लिक स्कूल)

तृतीय क्रमांक – मंथन लौदघरे (हडस हायस्कूल)

प्रोत्साहनपर पुरस्कार – सर्वदा महाकालकर (रेडिसन स्कूल), अपर्णा अग्रवाल (विमलादेवी स्कूल), कार्तिकीय डोरले (प्रहार मिलिटरी स्कूल), पलक झोडापे (कुर्वेज स्कूल)

पारितोषिक वितरण सोहळ्यास शाळेचे सचिव श्री. विजय कागभट, प्रमुख अतिथी मॅनेजमेंट ट्रेनर इंडियन डिफेन्स फोर्स श्री. कुमार व्हराडपांडे तसेच परीक्षक श्री. किशोर सोनटक्के आणि श्री. प्रफुल्ल माटेगावकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आनंद व्यक्त केला आणि “अशा उपक्रमांमुळे कला, संस्कृती आणि पर्यावरण – तिन्हींची जपणूक होते” असे गौरवोद्गार काढले.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्रहार मिलिटरी स्कूल ही केवळ शैक्षणिक यशासाठीच नव्हे तर सामाजिक जाणीव वाढवणाऱ्या उपक्रमांसाठीही ओळखली जाते, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उत्साही शिक्षिका सौ. भाग्यश्री चौधरी यांनी प्रभावीपणे केले. शेवटी उपस्थितांनी उभे राहून ‘वंदे मातरम्’च्या गीताने कार्यक्रमाची सांगता केली.