अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विद्यार्थ्याचे उपोषण

0

 

(Buldhana)बुलढाणा- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांनी भ्रष्टाचार करून काही मोजक्या विद्यार्थ्यांना चुकीच्या गोष्टींमध्ये अभय देत संस्थेमध्ये आर्थिक भ्रष्टाचार केला. त्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर तीन दिवसापासून उपोषण सुरू केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी याने २१ ऑगस्ट २०१६ मध्ये संस्थेमधील होत असलेले आर्थिक भ्रष्टाचार व विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन विद्यार्थ्यांच्या गैरहजेरी या हजेरीपटामध्ये हजर दाखवण्याचा प्रकार समोर आणला होता. यामध्ये भ्रष्टाचार समोर आणल्याच्या रागातून त्या विद्यार्थ्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून कुठलेही कारण न देता काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही विद्यार्थी बाहेरगावी परीक्षेसाठी गेलेले असताना सुद्धा त्या दिवशीच्या हजेरीपटामध्ये त्यांची उपस्थिती असल्याचे दाखवण्यात आले आहे.

ज्या दिवशी विद्यार्थी गैरहजर होते, त्या दिवशी खामगाव जवळील वाडी येथील एका डॉक्टरांकडून सहा विद्यार्थ्यांचे अधिक प्रशिक्षण संस्थेमधील एका शिक्षक आहे, पैसे घेऊन एकाच दिवशी मेडिकल सर्टिफिकेट आणून व त्यावर सहा विद्यार्थ्यांना एकच आजार असल्याचे सर्टिफिकेट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिले होते. या सर्व प्रकाराची माजी विद्यार्थ्यांनी कसून माहिती घेतली असता त्या संबंधित सर्व कागदपत्रे त्याने जमा करून या सर्व अधिकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या विरोधात कारवाई करावी, यासाठी अनेक वेळा निवेदन देऊन मागणी केली होती.

त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्राचार्य यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. सोबतच यामध्ये दोषी असलेल्या सर्व शिक्षकांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरुपात आपली चूक कबूल केली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई आजपर्यंत ही करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन, आत्मदहनाचा इशारा दिला आहे.