

निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलन चिघळणार
यवतमाळ (yawatmal ) – निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मुख्य भिंतीत येणाऱ्या खडका व खंबाळा या दोन्ही पेसा अंतर्गत ग्रामसभेने काही मागण्या व अटी टाकून धरणाला समर्थन असल्याचा ठराव दिला होता. परंतु, ग्रामसभेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून काम करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतच्या क्षेत्रात धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामाला सुरुवात केली आहे. या भागात जिऑलॉजिकलसह अन्य सर्व्हे करण्यात आले नाही. हुकुमशाही पद्धतीने या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा 27 वर्षांपासून लढा सुरू आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मुबारक तवर, माजी जिल्हा परिषद सदस्य,प्रल्हाद गावंडे, शेतकरी यांनी दिला.