

Stree-2 Box Office Collection : ‘स्त्री’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला मिळणारा प्रतिसाद पाहता, या चित्रपटाचा एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला आहे. बॉक्स ऑफिसवर एखादा चित्रपट येतो, तो पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो; मात्र दुसऱ्या आठवड्यात नवे चित्रपट प्रदर्शित झाले की, प्रेक्षकांचं लक्ष दुसऱ्या चित्रपटांकडे जातं. परंतु, ‘स्त्री २’ याला अपवाद ठरला आहे. या चित्रपटानं सलग १० व्या दिवशीदेखील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून, सध्या बॉलीवूडमध्ये ‘स्त्री २’ची चर्चा आहे.
सलग १० व्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटानं २०२४ मधील आतापर्यंतच्या चित्रपटांचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. या संदर्भात (stree2) चे दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या इन्स्टाग्राम पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ’स्त्री २’नं दुसऱ्या आठवड्यातदेखील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला आहे. या चित्रपटानं सलग १० व्या दिवशी एकूण ४२६ कोटींची कमाई केली असून, वर्ल्ड वाइबवर ५०५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटानं दुसऱ्या शनिवारी तब्बल ३३ कोटींची कमाई केली. प्रेक्षकांच्या पसंतीमुळे दुसऱ्या आठवड्यातही ‘स्त्री २’ हा ‘ब्लॉकबस्टर सिनेमा’ ठरला आहे.
देशभरात आणि वर्ल्ड वाइबवरदेखील ‘स्त्री २’ची चर्चा आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत (stree2) चे दिल्लीतील चित्रपटगृहांत एकूण ११९५ सर्वाधिक शो झाले आहेत; तर बंगळुरूमध्ये ३७३ शो दाखविण्यात आले आहेत. मुंबईतदेखील ‘स्त्री २’ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत या चित्रपटाचे ११३६ शो झाले असून, पुण्यात ४२४ शो झाले आहेत.
याच पार्शभूमीवर चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल राजकुमार रावने माध्यमांना मुलाखत दिली होती, त्याने सांगितलं की, ‘स्त्री’चा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेेळी प्रेक्षकांनी भरभरुन पसंंती दिली होती. तेव्हापासून या चित्रपटाचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल करायचं ठरवलं तेव्हा एक अभिनेता म्हणून मला हे माहित होत की, प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील चांगला प्रतिसाद देतील. मात्र सध्या ‘स्त्री २’ प्रकारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करतोय ते आमच्या अपेक्षेपेक्षा ही जास्त आहे. त्यामुळे चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून आनंद वाटतोय, असं राजकुमार राव याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.