जिल्ह्यातला तमाशा थांबवा – नाना पटोले

0

 

अमरावती – भाजपनेतेखा अनिल बोंडे यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावती दौऱ्यावर आले असतां त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. अमरावती हा वैचारिक लोकप्रतिनिधीची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणारा जिल्हा आहे. मात्र, इथे खालच्या पातळीवर जाऊन चारित्र्यावर बोलणं सुरू आहे. तर सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी अमरावती जिल्ह्याचा तमाशा थांबवावा हीच आग्रहाची विनंती आहे, असं नाना पटोले यांनी म्हटले आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या वतीने अमरावतीत पश्चिम विदर्भाची आढावा बैठक घेण्यात येत आहे. राज्यभरात आम्ही आढावा घेत आहोत. आज अमरावती विभागाचा आढावा घेत आहोत. संघटनात्मक हा आढावा असणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह असून राज्यात व देशात काँग्रेसच पर्याय आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.