20 फेब्रु ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यभर धरणे आंदोलन

0

चिखलदरा येथील राज्यस्तरीय सिंहावलोकन शिबिरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.बबनराव (Banbanrao Taywade ) तायवाडे गरजले..

दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यस्तरीय सिंहावलोकन शिबिर व राज्यस्तरीय ओबीसी परिषद चिखलदरा येथे संपन्न..

जगद्गुरु तुकोबाराया यांच्या जयंतीदिनी राज्यभरातील जवळपास 300 ओबीसी पदाधिकारी चिखलदरा येथे एकवटले…
शिबिराचे उद्घाटन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस श्री सचिन राजूरकर, राष्ट्रीय सचिव श्री शरद वानखेडे, शिबिराचे स्वागतध्यक्ष व आयोजक व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रकाश साबळे, राज्यस्तरीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश भागरथ, सौ ज्योती ढोकणे, रत्नमाला पिसे, श्याम लेडे, राज्य प्रवक्ता ऋषभ राऊत, वक्ते श्री बबलू कटरे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

२९ सप्टेंबर २०२४रोजी ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या आमरण उपोषण नंतर राज्य सरकारने ओबीसी महासंघ सोबत झालेल्या बैठकीनुसार मंजूर झालेल्या प्रलंबित मागण्या, ओबीसी वस्तीगृह, महाज्योती या संस्थेचे विभागीय कार्यालय विभागवार स्थापित होण्याबाबत, आधार योजनेतील रक्कम अजूनही विध्यार्थ्यांना मिळालेली नाही, सुशिक्षीत बेरोजगारांना 15 लाख मर्यादा अजूनही केली नाही, 13 सप्टेबर 2017 पासून क्रिमीलेअरची मर्यादा वाढलेली नाही ती वाढविण्यात यावी ,अशा विविध ज्वलंत ओबीसींच्या प्रश्नाबाबत राज्यभरात 20 फरवरी धरणे आंदोलन घेण्याबाबतचे मत राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी सर्वानुमते मांडले. तसेच विभागवार संवाद दौरे, संघटना बाबत दिशा व धोरण याबाबत कृती आराखडा सर्वानुमते मंजूर करण्यात आला.