pandharpur wari लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0

 

मुंबई Mumbai  : pandharpur wari आषाढी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय State Govt राज्य सरकारने घेतला आहे. सुमारे 15 लाख भाविकांची आरोग्य तपासणी या वारीत होणार असल्याने ही वारी एकप्रकारे arogywari “आरोग्यवारी” ठरणार आहे. eknath shinde राज्यातील शिंदे सरकारने वारकऱ्यांसाठी यंदाची वारी आरोग्यवारी करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेची जबाबदारी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्यावर सोपवली असून जवळपास 10 हजार तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय स्टाफ लाखो वारकऱ्यांच्या सेवेत असतील. वाखरी पालखी तळावर हे पहिले मोठे महाआरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. 27 आणि 28 जून असे दोन दिवस लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. सावंत यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. State government’s decision to conduct health check-up of lakhs of workers 

पालखी सोहळे पंढरपुरात दाखल झाल्यावर 29 जून आणि 30 जून रोजी दर्शन रांग असणाऱ्या गोपाळपूर पत्रा शेडजवळ दुसरे महाआरोग्य शिबीर सुरु होणार आहे. याचवेळी साडेतीन लाख भाविकांच्या निवासाची व्यवस्था असणारे तिसरे आरोग्य शिबीर सोलापूर रोडवरील 65 एकराजवळ ठेवण्यात आले आहे. पालखी सोहळ्याच्या सोबत आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या 463 दिंड्यांची तपासणी संपूर्ण मार्गावर झाली असून यातही लाखो वारकऱ्यांची तपासणी राज्याच्या आरोग्य विभागाने केली आहे. संपूर्ण यात्रेत जवळपास 15 ते 16 लाख भाविकांच्या आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी औषध साठे, वैद्यकीय उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण पुरविण्यात आले आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.