

२०२५ मध्ये १३७०० पदे भरणार
सरकारी किंवा बँकेत नोकरी करण्याची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने मोठी भरती काढली आहे. यासाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवार स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरात पाहू शकणार आहेत. तसेच ऑनलाईन अर्जासह परीक्षा शुल्कही भरू शकणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) क्लार्क पदासाठी तब्बल १३७३५ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीचे नोटीफिकेशनही जारी करण्यात आले आहे. आज १७ डिसेंबरपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत.
आजपासून अर्ज करण्यास सुरुवात
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ जानेवारीस २०२५ पर्यंत असणार आहे. याची परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. प्रीलिम्स परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ही परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा वेळोवेळी बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क रुपये 750 असून आरक्षणातील प्रवर्गांना हे शुल्क माफ करण्यात आले आहे. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगद्वारे फी भरता येणार आहे.