
घटनेत एक सफाईकर्मी जख्मी
नागपूर हुन काटोल ला जात होती बस
बसच्या धडकेने विद्युत खांब पडला रस्त्यावर
(Nagpur)नागपूर — नागपूर हुन काटोल वर जाणाऱ्या एसटी ची बस अचानक दुभाजकावर चढली या घटनेत एक सफाईकर्मी गंभीर रित्या जखमी झाला , मिळालेल्या माहितीनुसार नागपूर च्या एस टि डेपो तुन निघालेली बस क्रमांक एम एच 40वाय 5116 (Katol)काटोल करता निघाली असता (Gittikhadan Chowk)गिट्टीखदान चौक च्या पुढे हि बस अचानक दुभाजकावर चढली प्रत्यक्ष दर्शींच्या मते या बसच्या पुढे जाणाऱ्या मोटर सायकलच्या मागच्या बाजूला बसलेल्या युवकाच्या हातात खिळ्यांचा बॉक्स होता तो त्याच्या हातून निसटून पडला हा बॉक्स उचलण्यासाठी गाडीवरचा युवक थांबला असता मागून येणाऱ्या बस च्या ड्रायवर ने या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी गाडी दुभाजकावर चढवली.
दरम्यान दुभाजकावर असलेला विद्युत खांब देखील बसच्या धडकेने तुटून पडला , या घटनेत वाटेत रस्त्याची सफाई करत असलेला एक सफाई कर्मी देखील जखमी झाला प्रत्यक्ष दर्शींच्या मते त्याचा पायाला गम्भीर दुखापत झाली घटनेच्या वेळी बस मध्ये बरेच प्रवासी देखील सवार होते , या दुर्घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले , एकंदरीतच एका व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी या बस ड्रायवर ने बाकी प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याची चर्चा परिसरात होत आहे .