राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत श्रीपाद काळे यांना दोन सुवर्ण

0

 

नागपूर- सुपर मास्टर्स गेम्स ऍन्ड स्पोर्टस फ़ेडरेशन्च्या अखत्यारितील मास्टर्स गेम्स असोसिएशन, गोवा यांच्या विद्यमाने मडगाव, गोवा येथे आयोजित 6 व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत श्रीपाद काळे यांनी दोन सुवर्ण पदक आणि एक कास्य पदक पटकावित या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. महावितरणच्या नागपूर परिमंडलातील उमरेड (शहर) शाखा – 2 येथे सहायक अभियंता म्हणुन कार्यरत असलेल्या श्रीपाद काळे यांनी या स्पर्धेतील 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि 20 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्ण पदक तर 100 मीटर फ़्रीस्टाईल या प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त करीत कास्य पदक पटकाविले.

नुकत्याच नागपूर येथे आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव” या क्रिडा स्पर्धेतील जलतरण या क्रीडा प्रकारात 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि 200 मीटर बॅकस्ट्रोक या दोन्ही स्पर्धेत श्रीपाद काळे यांनी प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदक आणि 100 मीटर फ़्रीस्टाईल स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलिप दोडके, अधीक्षक अभियंता राजेश नाईक, कार्यकारी अभियंता चंदन तल्लारवार, उपकार्यकारी अभियंता दिलीप राऊत आणि इतर सहका-यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू | Rajgira Pithache Laadoo | Shankhnaad News #shankhnaadnews #live