
श्रीहरिकोटा Sriharikota , 06 जानेवारी : भारतीय अंतराश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) आदित्य एल-1 हे अंतराळयान आज, शनिवारी दुपारी 4 वाजता एल-1 पॉईंटवर पोहचले. ISTRAC च्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्समधील इस्रोचे वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी ही प्रक्रिया पार यशस्वीपणे पार पाडली.
इस्रोच्या वैज्ञानिकांनी या उपग्रहाला एल-1 बिंदूवरील हेलो कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी मॅन्यूव्हर राबवले. अगदी अलगदपणे आदित्य उपग्रह याठिकाणी ठेवण्यात आला. आता इथूनच पुढील 5 वर्षे तो सूर्याचे निरीक्षण करेल, आणि मिळालेली माहिती इस्रोला पाठवेल. आदित्य यानाने देखील इस्रोला एक संदेश देत आपण सुरक्षितपणे एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचल्याचे सांगितले आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. “एवढ्या दूर असूनही मी तुमच्या अगदी जवळ आहे. आपण सूर्याची गुपिते आता उघड करणार आहोत” अशा आशयाची पोस्ट इस्रोच्या आदित्य एल-1 या ट्विटर हँडलवरुन (एक्स) करण्यात आली आहे.
हे यान 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. हे यांन प्रक्षेपित झाल्यावर पृथ्वीभोवती चार फेऱ्या मारून सूर्याच्या लँगरेन बिंदूच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. बेंगळुरूमधील इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क येथून यावर लक्ष ठेवले जात आहे. हे यान पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या एल-1 बिंदूच्या दिशेने गेल्या 110 दिवसांपासून मार्गक्रमण एल-1 पॉईंटवर पोहचले आहे.
आदित्य एल1 ही इस्रोची महत्त्वाकांक्षी सौर मोहिम आहे. या मोहिमेद्वारे सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. आज या मोहिमेत महत्त्वाचा अंतिम टप्पी पार पडला आहे. आदित्य-एल-1 मध्ये 7 पेलोड आहेत जे सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सर्वात बाहेरील थराचे (कोरोना) निरीक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तर 4 पेलोड थेट सूर्याचे निरीक्षण करतील,
तर उर्वरित 3 पेलोड एल-1 बिंदूवर कण आणि फील्डचा इन-सीटू अभ्यास करतील. आदित्य-एल-1 मिशन स्पेसक्राफ्ट 5 वर्षांसाठी काम करणार आहे. या काळात यानावरील पेलोड कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, स्पेस वेदर डायनॅमिक्स आदींचा अभ्यास करतील. आदित्य-एल1 हा अवकाशात सौर वेधशाळा स्थापन करण्याचा भारताचा पहिला प्रयत्न आहे. मुळात आदित्यला पृथ्वीपासून 800 किमी उंचीवर ठेवण्याची योजना होती. पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आणि आता, आदित्यला लँगरेन पॉईंट एल-1 जवळ ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. म्हणूनच, या मिशनला आदित्य-ए1 असे नाव देण्यात आले आहे.