


नागपूर (Nagpur) :दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर श्रीसिद्धिविनायक पब्लिसिटीतर्फे दोन सुरेल दिवाळी पहाट कार्यक्रमांचे येत्या, 18 व 19 ऑक्टोबर रोजी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमाची संकल्पना श्रीसिद्धीविनायक पब्लिसिटीचे संचालक समीर पंडीत यांची आहे.
तात्या टोपे नगर नागरिक मंडळाच्या सहकार्याने शनिवार 18 ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता तात्या टोपे नगर येथील श्री गणेश मंदिर, तात्या टोपे हॉल येथे “मंगलदीप प्रभात” होईल. या कार्यक्रमात श्रेया खराबे-टांकसाळे, सारंग जोशी आणि निकेता जोशी आपली गायनकला सादर करतील.
लायन्स क्लब ऑफ नागपूर हेरिटेज यांच्या सहकार्याने रविवार, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता सीताबर्डी येथील अमृत भवन, उत्तर अंबाझरी रोड येथे “स्वरदीप” हा कार्यक्रम होईल. यात आरती बुरडकर, सारंग जोशी, निकेता जोशी आणि शशिकांत वाघमारे हे कलाकार सुरेल गाणी सादर करतील. या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर भरत भलघट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या दोन्ही कार्यक्रमात परिमल जोशी, महेंद्र वाटुळकर, पंकज यादव आणि ऋग्वेद पांडे वाद्यसंगत करतील. या दोन्ही कार्यक्रमांचा रसिकांनी आस्वाद घ्यावा व दिपावली सुरेल करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.