

श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था आणि महाएंजियो फ़ेडरेशन यांच्या सयुक्त विद्यमानाने पीपला ईथे २१ जून रोजी योगा दिवस निम्मित योगाचे आयोजन करन्यात आले योगा शिक्षक मेधा चितगोपेकरं यानी
मार्गदर्शन केले कार्यक्रमा चे अध्यक्ष श्रमिक मंत्रालय शिक्षण अधिकारी मरोआरक सर ,संध्या भोयर संचालिका श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था पीपला नागपुर कार्यक्रमचे आयोजन सुषमा नागपुरे आणि जोशीला सोंडवले यानीं केले
बचत गटातिल महिलाना आरोग्य विषयी महिती देउन आहारा विषयी संगीतले आणि योगाचे महत्व समजून योगा करुण घेंतला। आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली योगा केल्यामुळे नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविणे हा एकमेव पर्याय सर्व वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत.
हजारो वर्षां पासून भारतात योग, प्राणायाम हा उत्तम आरोग्याच्या मंत्र सांगितला आहे.