

श्री गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर, ( Nagpur):- श्री गुरुमंदिर, जयप्रकाश नगर नागपूर (Jaiprakash Nagar Nagpur) प्रणित समर्थ सद्गुरू श्री विष्णुदास महाराज अध्यात्म साधना नागपूर केंद्रातर्फे द्वि-दिवसीय श्री गुरूपौर्णिमा उत्सवाचे श्री गजानन महाराज मंदिर, सहकार नगर येथे बुधवार ९ जुलै पासून आयोजन करण्यात आले आहे.
९ तारखेला रोजी दुपारी ४.३० वाजता वणीहून प. प. टेंब्ये स्वामी महाराजांच्या पादुकांचे सहकार नगर येथे आगमन होईल. सायंकाळी विशेष उपासना होऊन श्री अजेय देशमुख हे श्री विष्णुदास स्वामी महाराज फाऊंडेशनची माहिती देतील. रात्री ७ वाजता “कीर्तन कौस्तुभ”(Kirtan Kaustubh) ग्रंथातील धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज ह्यांनी निरुपण केलेल्या अभंगावर उपासक चिंतन मांडतील.
गुरुपौर्णिमा तिथिनिमित्त गुरुवार १० जुलै रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती नंतर उपासना होईल. सकाळी ९.३० वाजता धर्मभास्कर सद्गुरूदास महाराजांचे ह्यांचे पूजन व सकाळी १० वाजता त्यांचा सत्संग होणार आहे. महाप्रसादानें श्री गुरूपौर्णिमा उत्सवाची सांगता होईल. सर्व उपासक मंडळींनी ह्या द्वि-दिवसीय उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रप्रमुख श्री कल्याण पुराणिक ह्यांनी केली आहे.
Gajanan Maharaj temple Shegaon
Gajanan Maharaj Sansthan Ujjain room booking
Gajanan Maharaj Temple near me
Shegaon temple history
Gajanan Maharaj Sansthan Branches
Shegaon temple information
Gajanan Maharaj wikipedia in Marathi
Gajanan Maharaj Mandir Nagpur