pandharpur आषाढी यात्रा काळात होणार पंढरपुरात स्प्रिंकलरचा वापर

0

 

पंढरपूर pandharpur  – यंदा आषाढी एकादशीला सुमारे 15 लाख भाविक पंढरपूरला येण्याची शक्यता आहे. या दरम्यान भाविकांना उष्माघाताचा त्रास होवू नये यासाठी वारी काळात शहरात विविध ठिकाणी पाण्याचे फवारे बसविण्यात येणार आहेत. अशा प्रकारे फवारे पहिल्यांदाच बसविण्यात येणार आहेत. यंदा उन्हाचा आणि उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. यामध्ये यात्रा काळातील सोयी सुविधांवर चर्चा झाली. यामध्ये उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेवून गर्दीच्या ठिकाणी स्प्रींकलर (पाण्याचे फवारे) बसविण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सल्लागार निवृत कर्नल सुपानीकर यांनी दिली.