“संकल्प से सिद्धी – मोदी सरकारचे ११ यशस्वी वर्ष” या कार्यशाळेला सिविल मंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद

0
"संकल्प से सिद्धी – मोदी सरकारचे ११ यशस्वी वर्ष" या कार्यशाळेला सिविल मंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद
"संकल्प से सिद्धी – मोदी सरकारचे ११ यशस्वी वर्ष" या कार्यशाळेला सिविल मंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांचे मार्गदर्शन..

चंद्रपूर (Chandrapur) :- सिविल मंडळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने “संकल्प से सिद्धी – मोदी सरकारचे ११ वर्ष” या विशेष उपक्रमांतर्गत चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात मंडळ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन…

या कार्यशाळेत भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौर सौ. राखीताई कंचर्लावार, भाजपा ज्येष्ठ नेते अरुण तीखे, नगरसेवक बंटी चौधरी, नगरसेविका वंदना तीखे, भाजपा माजी नगरसेवक व कार्यकर्ते, मंडळ प्रमुख, युवा मोर्चा पदाधिकारी, महिला मोर्चा कार्यकर्त्या तसेच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

कार्यशाळेमध्ये केंद्र सरकारच्या (Central Governent) ११ वर्षातील यशस्वी योजनांचा आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, तसेच डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या अभिनव उपक्रमांमुळे देशात झालेला आमूलाग्र बदल उपस्थितांसमोर मांडण्यात आला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरिब, महिला, शेतकरी, युवा यांच्यासाठी क्रांतिकारी योजना राबवून सरकारने त्यांचं जीवनमान उंचावलं आहे. हा आमच्या सरकारचा कार्यसंघटीत आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन आहे.”

कार्यशाळेत कार्यकर्त्यांनीही आपले अनुभव आणि सूचना मांडल्या. उपस्थितांच्या सहभागाने कार्यशाळेला एक विचारमंथनात्मक आणि ऊर्जावान स्वरूप प्राप्त झाले. नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे व उपस्थित नागरिकांचे आभार मानून कार्यशाळेचा समारोप केला. कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी ठरवण्यासाठी भाजप मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.