

धनत्रयोदशीचा सण हा दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणाची सुरुवात मानला जातो. हा सण आरोग्य, संपत्ती आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते, कारण धन्वंतरी यांना आरोग्याचे देव मानले जाते. यामुळेच या दिवसाला “धनत्रयोदशी” असे म्हटले जाते.
काल नागपूरच्या सीताबर्डी येथील शिवशंकर आयुर्वेदिक महाजन मार्केटमध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने विशेष पूजा करण्यात आली. संपूर्ण शिवशंकर आयुर्वेदिक परिवाराने मिळून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. आयुर्वेदिक दैवत धन्वंतरीची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने आरोग्य व समृद्धीच्या कामना व्यक्त करण्यात आल्या. तसेच दिवाळी सणाचे औचित्य साधत, शिवशंकर आयुर्वेदिकचे संपूर्ण स्टाफने एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.