
‘खासदार औद्योगिक महोत्सव–अॅडव्हांटेज विदर्भ’च्या
स्थळाचे 3 जानेवारी रोजी भूमिपूजन
केंद्रीय मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट (एड) च्या वतीने येत्या 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान ‘खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हांटेज विदर्भ’ चे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील सर्वांत मोठ्या अशा या इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसर, नागपूर येथे होत आहे. महोत्सवाच्या या स्थळाचे भूमिपूजन बुधवार, 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता विदर्भातील सर्व खासदार तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
याप्रसंगी खासदार रामदास तडस (वर्धा), अशोक नेते (गडचिरोली), कृपाल तुमाने (रामटेक), प्रताप जाधव (बुलढाणा), भावना गवळी (वाशीम), डॉ. अनिल बोंडे (अमरावती), सुनील मेंढे (भंडारा) यांच्यासह वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अतुल गोयल, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, एमएसएमईचे संचालक पी. एम. पार्लेवार, गिन्नी अॅग्रो प्रॉडक्टचे रमेश मंत्री, हल्दीरामचे राजेंद्र अग्रवाल, शारदा इस्पात लि. चे नंदकिशोर सारडा, प्लास्टोचे विशाल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील.
वर्ल्ड ट्रेड सेंटर हे खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हांटेज विदर्भचे प्रमुख प्रायोजक असून, आयआयएम नागपूर सहप्रायोजक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे नॉलेज पार्टनर आहेत. एमएसएमई, एमआयडीसी आणि एमएडीसी यांचे आयोजनासाठी सहकार्य लाभत आहे. व्हीआयए, वेद, लघू उदृयोग भारती, बीएमए, एआयए, एसएमए, विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीयल असोसिएशन, व्हीएडीए, एमसीडीसी, क्रेडाई, एमगिरी, सीओएसआयए, एफआयए, टीईनागपूर, एआयआरईए, व्हीसीसीआय इत्यादी संस्था आयोजनात सहभागी होत आहेत.
या भूमिपूजन कार्यक्रमाला मोठा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एडचे अध्यक्ष आशीष काळे, उपाध्यक्ष प्रणव शर्मा व गिरधारी मंत्री, सचिव डॉ. विजय शर्मा, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य राजेश रोकडे, निखिल गडकरी, डॉ. महेंद्र क्षिरसागर, प्रदीप माहेश्वरी, प्रशांत उगेमुगे व रवींद्र बोरटकर यांनी केले आहे.