

नागपूर (Nagpur):- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील युवक-युवती तसेच इच्छुक नागरिकांसाठी एक विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत नूतन भारत विद्यालय, अभ्यंकर नगर, नागपूर येथे पार पडणार आहे.
या शिबिरात प्रविण्य प्राप्त व विषयतज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार असून, श्री. श्रीकांत कुलकर्णी (राज्य समन्वयक, MCED-अमृत योजना) आणि श्री. देवदत्त पंडित (विभागीय व्यवस्थापक, अमृत नागपूर) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
सदर मार्गदर्शन शिबिरास सर्व पात्र युवक-युवती व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पराग जोशी अध्यक्ष, सावली सोमण, समन्वयक आणि प्रशांत गौतमे, प्रमुख – उद्योग आघाडी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.