
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर कार्यालया मार्फत त्रुटी पुर्तते करीता शनिवारला सुटीच्या दिवशी विशेष मोहिमेचे आयोजन
सन २०२५-२०२६ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम मध्ये प्रवेशीत विद्यार्थी अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या सर्व प्रवर्गातील नागपूर(Nagpur) जिल्हयातील जात प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर यांचे कडे अर्ज सादर केलेले आहेत व ज्या अर्जदारांचे प्रकरणे त्रुटीपूर्तते अभावी समितीकडे प्रलंबीत आहेत अशा अर्जदारांना ऑनलाईन द्वारे एसएमएस(SMS), लेखी पत्राद्वारे व दुरध्वनीद्वारे त्रुटी पूर्ततेबाबात कळवूनही अर्जदारांनी अद्याप पर्यंत त्रुटीपुर्तता केलेली नाही.
अशा अर्जदारांची प्रकरणे निकाली काढणेकरीता माहे ५ जुलै २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ या दोन महिन्यातील प्रत्येक शनिवारी सुटीच्या दिवशी त्रुटी पुर्ततेबाबत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.ज्या अर्जदारांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे व ज्यांनी अद्याप पर्यंत त्रुटी पुर्तता केलेली नाही अशा अर्जदारांनी ५ जुलै २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय ITI समोर बी विंग, दुसरा माळा, नागपूर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत सर्व मूळ कागदपत्रासह विद्यार्थी किंवा पालक यांनी उपस्थित होवून त्यांचे अर्जामधील त्रुटी पुर्तता करावी.
















