विश्व नृत्य दिनानिमित्त स्पिक मॅकेचा कथक नृत्य समारोह 27 पासून

0

नागपूर (Nagpur) – भारतीय शास्त्रीय संगीत व संस्कृतीचा युवा वर्गात प्रसार व प्रचार करण्याच्‍या हेतूने कार्यरत राष्ट्रीय संगीत संस्था स्पिक मॅकेतर्फे विश्व नृत्य दिवस साजरा करण्यात येणार असून निमित्‍ताने कथक नृत्य समारोहाचे आयोजन 27 ते 29 एप्रिलला करण्यात आले आहे.
समारोहात 27 रोजी सायंकाळी 6. वाजता. दिल्लीचे सुप्रसिद्ध कथक गुरु पं. राजेंद्र गंगानी याचे कथक नृत्य चिटणवीस सेंटर, सिविल लाईन्‍स येथे सादर होईल. याच दिवशी कथक नृत्यांगना मोनिसा नायक हिचे कथक नृत्य स्वामी विवेकानंद विद्यालय आमगाव, गोंदिया येथे सायंकाळी 5.30 वाजता प्रस्तुत होईल.
दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता भारतीय विद्या भवन, श्रीकृष्ण नगर, वाठोडा येथे आणि 29 रोजी भारतीय विद्या भवन, सिविल लाईन्‍स येथे 10.30 वाजता मोनिसा नायक हिचे कथक कार्यक्रम सादर होईल. समारोहाचा समारोप 29 रोजी सायंकाळी 5.30 वाजता. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र व नृत्य बेला कथक इन्स्टिटयूट याच्या संयुक्त विद्यमाने मोनिसा नायक यांच्या कथक नृत्याने होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्‍हणून निशा कुलकर्णी, आभा मेघे, ऋचा येनूरकर, मधुरा गडकरी यांची उपस्‍थ‍िती राहील.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे रवी सातफळे, आभा पाराशर यांनी केले आहे.