गोडाऊन फोडून सोयाबीन बियाणे चोरी, चार जण पोलिसांच्या ताब्यात

0

 

(Buldhana)बुलढाणा : चिखली रोडवरील ओंकारेश्वर मंदिराजवळील गणेश ऑईलमोल मधील अंकुर अग्रवाल यांच्या गोडावून मधुन १४ जूनच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी ७ लाख ६ हजार ५० रुपयाचे सोयाबीन बियाण्याच्या १९५ बॅगा लंपास केल्या होत्या. याप्रकरणी (Ankur Agarwal)अंकुर अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोस्टला अज्ञात चोरट्याविरूद गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान पोलिसांनी राहुल ईश्वर चव्हाण (२०) व विजय रामा मांडवकर (२६) रा. दत्त मंदिर जवळ शिवाजी नगर योगेश ज्ञानदेव डाल (३३) रा. सुटाळा खु व दिपक गजानन गवळी (२३) रा. खुटपुरी या चौघांना काल रात्रीच अटक केली.. चौकशी दरम्यान उपरोक्त आरापिनी बियाण्याचा ३ लाख ५० हजार मुद्देमाल जप्त केला. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.