हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले पुढील अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून

0

नागपूर – राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मात्र या कामाला वेळ लागणार आहे. मराठा व इतर समाजांनी संयम ठेवावा मराठा आरक्षण ओबीसी व इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आम्ही देणारच अशी सुस्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नागपुरात 7 डिसेंबर पासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी उशिरा सूप वाजले यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढील अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून होणार असून याच विशेष अधिवेशनात अर्थात मार्चपूर्वी मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस,गिरीश महाजन,आशीष जैस्वाल उपस्थित होते. विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भाची चर्चा करण्यात विरोधक अपयशी ठरले, बेगडी प्रेम यातून दिसले. मगरमच्छ के आसू.. पाहायला मिळाले. विदर्भ विकासाच्या प्रश्नावर ते बोलले नाहीत. एक वाक्यता नसलेला अवसान गळलेला विरोधी पक्ष या अधिवेशनात बघायला मिळाला. अंतिम आठवडा प्रस्ताव हे विरोधी पक्ष नेते मांडतात व सहसा तो विदर्भावरच असतो मात्र यातही विरोधक अपयशी ठरले विरोधकांकडे या अधिवेशनात मुद्देच नव्हते एक वाक्यता नसलेला विरोधी पक्ष दिसला. विदर्भावर फोकस करून प्रश्न मांडण्याची अपेक्षा होती. सरकारला विदर्भाचे महत्त्व आहे विरोधक केवळ पायऱ्यावर उभे राहून आंदोलन करण्यापुरतेच दिसले. सरकार आपल्या कामातून, निर्णयातून त्यांना उत्तर देणार आहे. अवकाळी पावसावर चर्चा शेतकरी संकट याबाबतीत सरकार गंभीर आहे.आजवर झाली नाही ती 44000 कोटींची मदत महायुतीने शेतकऱ्यांना केली. धानाला बोनस पूर्वी 15000 होता तो हेक्टरी 20000 दिला. समृद्धी महामार्गावर 13 कांदा महा बँक सुरू होत आहेत. राज्यातील 64 सिंचन प्रकल्प मार्गी लागले .यातील विदर्भातील 29 आहेत असे विविध मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निमित्ताने स्पष्ट केले.