ग्रामायण सेवा प्रदर्शनात गीत रामायण

0

 

नागपूर NAGPUR दि. २४ डिसेंबर २०२३: रामनगर मैदान येथे ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या ग्रामायण सेवा प्रदर्शनात  GRAMAYAN SEWA PRADASHN  शनिवारी संध्याकाळी गीत रामायणाचा कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांचे शिष्य व संस्कार भारतीचे कार्यकर्ते नामदेव रामकृष्ण बालपांडे यांनी गीत सादर केले.

प्रसिद्ध गायक नामदेवराव बालपांडे हे मूळचे तारसा, रामटेक जिल्हा नागपूर येथील आहेत. ते या भागात मंडईत गीत रामायणाचा कार्यक्रम घेतात. त्यांनी या कार्यक्रमात रामायणातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगांची गाणी सादर केली. त्यांची गाणी भावपूर्ण होती. त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात आर्यन पुराणकर याने हार्मोनियम, तर श्रेयस नितीन जोशी तबला साथ दिली. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र गिरीधर यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे यांनी नामदेवराव बालपांडे यांचे आभार मानले.