संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला सामाजिक संघटनांकडून विरोध

0

 

वाशिम – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचेविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केल्या नंतर संभाजी भिडे यांचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. आज वाशिम येथे संभाजी भिडे एका कार्यक्रमात संबोधित करण्याकरिता येत असून भिडे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याकरिता तसेच निषेध करण्याकरिता सर्व सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत. यानिमित्ताने भिडेंविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी करण्यात येत आहे.