
आज सकाळी दि.26 नोव्हेबर24 सकाळी 8.40 वा.संविधान चौक नागपुर येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.सर्वं प्रथम विदर्भं प्रांत सह संघ चालक श्री श्रीधर गाडगे व प्रा सुधाकर इंगळे यांनीप.पु.डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प माला अर्पण करण्यात आली.त्यानंतर सर्व कार्यंक्रत्यांनी संविधानाचा गौरव वाढविणारे नारे दिले.’संविधानाची महानता विविधेत एकता’ ‘संविधानाचा सन्मान ,भारताचा अभिमान.’देशभर ऐक ही नाम,संविधान संविधान.
‘लोकशाहीचा आदर, संविधानाचा जागर’
या प्रसंगी डाॅ.शंकर राव वानखेडे यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले व इतरांनी अनुसरण केले .डाॅ ममतानी यांनी हिंदीतुन प्रास्ताविकेचे वाचन केले.अजनी भाग अयोध्या ,सदर बिनाकी,सोमलवाडा,नंदनवन मोहीते भाग येथुन मोठया प्रमाणावर कार्यंक्रते उपस्थित होते.भारतीय संविधानाचा सन्मान केला.हा नेत्रदिपक सोहळा उपस्थित आश्चर्याने न्याहळत होते.भाग संयोजकानी मेहनत घेउन कार्यंक्रम यशस्वी केला.
















