


नागपूर : श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, नागपूर संचालित ‘सोबत पालकत्व प्रकल्प’ तर्फे उद्या, 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता लक्ष्मीनगरातील जेरील लॉन येथे दिवाळी मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी आणि नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल उपस्थित राहतील. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ‘सोबत पालकत्व प्रकल्प’शी संलग्न पालक, बालक व स्वयंसेवक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘सोबत पालकत्व प्रकल्पा’तर्फे आयोजित हा उपक्रम समाजातील पालकत्व हरवलेल्या मुलांसाठी आनंद, आधार आणि आपलेपणाचा संदेश देणारा ठरतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आमंत्रक श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष आमदार संदीप जोशी आणि कार्यक्रमाचे संयोजक अनंत टोळ, ज्योत्स्ना कुऱ्हेकर, प्रकाश रथकंठीवार, प्रणय मोहबंशी आणि प्रणव घुगरे यांनी केले आहे.