

जळगाव(Jalgaon) : लाडकी योजना बहीण कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही त्यांनी जाहीर केले. मुक्ताईनगर येथे सोमवारी महायुतीचा मेळावा झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बँक खात्यात जमा केले आहेत.
Nagpur Main About Us Privacy Policy चंद्रकांत पाटील यांना शिंदेसेनेतर्फे उमेदवारी मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात शिदेसेनेत प्रवेश केला, यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर केली. आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे मी सीएम नाही, तर कॉमन मॅन आहे, असे मुख्यमंत्री शिदे यावेळी म्हणाले. राज्य सरकारने तीर्थयात्रेसारख्या विविध लोककल्याणकारी योजना सुरू केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकत चालली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.