चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर घनदाट वस्तीत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
रात्री उशिरा वनविभागाच्या शिघ्र प्रतिसाद पथकाने राबविले सफल अभियान
चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापुर या घनदाट वस्तीत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेले काही दिवस या भागात दिवस-रात्र या बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. यानंतर वनविभागाने दोन ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते.
यातील एका ठिकाणी हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. यानंतर या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काही पाळीव जनावरांचा फडशा पाडत या भागात बिबट्याने आपली दहशत कायम केली होती. बिबट्याच्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















