

प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्स्लोरेटरीचे आयोजन
नागपूर (Nagpur), २८ एप्रिल
प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी (पीआरएसएससी) द्वारे पेंच अभयारण्यात शनिवारी रात्री “अ नाईट विथ द स्टार्स” या आकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 10 ते 16 वर्षे वयोगटातील सुमारे 65 उत्साही शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
हिमाचल प्रदेशातील आयएपीटी (नासनी) च्या राष्ट्रीय खगोलशास्त्र नेटवर्कचे माजी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय समन्वयक प्रो. हेमंत कुमार यांच्यासह आयएपीटी एसआरसी विदर्भाचे अध्यक्ष प्रा.एस.डब्ल्यू. अनवाने, धरमपेठ विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे उपप्राचार्य प्रशांत आंबेकर व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूरचे डॉ. जस्मीर रंधावा, आयएपीटी एसआरसी विदर्भाचे उपाध्यक्ष डॉ. गोविंदा लखोटिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा.एस.डब्ल्यू. अनवाने यांनी कृष्णविवर आणि सामान्य खगोलशास्त्र यासारख्या आकर्षक विषयांवर माहिती दिली तर तर प्रा. हेमंत कुमार यांनी विद्यार्थ्यांना दुर्बिणीद्वारे चंद्र, शुक्र, तेजस्वी तारे आणि दूरच्या आकाशातील वस्तूंचे जवळून दर्शन घडविले. यावेळी हँड-ऑन उपक्रम व कथाकथनाचाही विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. पीआरएसएसईच्या संचालिका डॉ. सीमा उबाळे यांनी विविध उपक्रमांची माहिती देत सर्वांचे आभार मानले.