दिशा मृत्यू प्रकरणी आज SIT स्थापन होणार

0

नागपूर : दिशा सालियन Disha Salian मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी आज एसआयटी स्थापन होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गृह विभागाच्या मुख्य सचिवांना राज्य सरकारने लेखी आदेश दिले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना लक्ष्य केले. नितेश राणे म्हणाले की, “आम्ही तिसऱ्या गिअरवर गाडी टाकली आहे. खरा खुनी काल विधानसभा परिसरात दिसला, त्याच्यावर लवकर कारवाई होईल”, असे ते म्हणाले.
आमदार नितेश राणे म्हणाले, या प्रकरणाची सर्व उत्तरे चौकशीतून मिळणार आहेत. आम्ही देखील थांबलोय. एसआयटी स्थापन झाल्यावर आदित्य ठाकरे यांच्यासोबत मला देखील बोलवा. आदित्य आणि मला समोरा समोर बोलवा, असा प्रस्तावही नितेश राणे यांनी दिला आहे.