

मुंबई, (Mumbai)३० मे : सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर (Famous singer Arya Ambekar) हिने नुकतेच मुंबईत दोन बहारदार कार्यक्रमांचा नजराणा सादर केला ज्याला मुंबईकरांनी भरपूर दाद दिली. मुलूंड आणि बोरिवली येथे पार पडलेल्या या कार्यक्रमांत आर्या आंबेकर एका नव्या ढंगात पहायला मिळाली, जी प्रेक्षकांसाठी कधीही न अनुभवलेली एक सुरेल पर्वणी ठरली. या कार्यक्रमांचे दिग्दर्शन पराशेअर एन्टरटेन्मेट्सचे हर्षद पराशरे यांनी केले होते.
नेहमी गाण्याची मैफल सादर करणारी आर्या यावेळी कॉन्सर्ट फॉरमॅटमध्ये अनुभवायला मिळाली. आर्याची ही नवी अदा बघण्यासाठी प्रेक्षकही चांगलेच उत्सुक दिसले. या कार्यक्रमात आर्याने भावगीत, भक्तीगीत, नाट्यसंगीत, गझल इथपासून चित्रपट गीत आणि सिरियलच्या शिर्षकगीतांपर्यंत हर प्रकारच्या गाण्याचे सादरिकरण केले. दर्दी रसिकांच्या सक्रिय सहभागाने या कार्यक्रमांची रंगत आणखीनच वाढली.
लवकरच आर्याच्या या कॉन्सर्टचा अमेरिका दौरा पार पडणार आहे, ज्याचे आयोजनही पराशेअर एन्टरटेन्मेट्स तर्फे करण्यात आले आहे.