सिंदखेडराजा ते पाचाड यात्रा सिंदखेडराजा येथून रवाना

0

 

बुलढाणा : 17 जून ला राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांचे पुण्यतिथीचे औचित्य साधून सिंदखेडराजा ते पाचाड ही यात्रा बुलढाणा जिल्ह्याच्या माँ जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथून आज रवाना झाली आहे. ही यात्रा 17 जूनला रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या माँ जिजाऊ यांच्या समाधी स्थळ पाचाडला पोहचून जिजाऊ माँ साहेबांना अभिवादन करणार आहे. गेल्या दोन वर्ष पासून नव्या पिढीला राष्ट्रमाता जिजामाता यांचा इतिहास कळावा त्यांच्या विषयी माहिती व्हावी म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजांच्या माँ जिजाऊंच्या जन्मस्थळ ते रायगड जिल्ह्यातील पाचाड येथील जिजाऊ यांच्या समाधी स्थळ अशी यात्रा जिजाऊ भकतांनी सुरू केली आहे.या यात्रेत जिजाऊंच्या स्पर्शाने पुनीत झालेली माती तांब्याच्या कलशमध्ये यात्रेत घेवून जाण्यात येते, ही यात्रा राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांची पुण्यतिथीच्या दोन दिवसा आधी काढण्यात येत आहे. समाधी उत्सवाच्या दिवशी पाचाडला पोचते.