
संस्कृत भारती नागपूर महानगरचे आयोजन
संस्कृत भारती विदर्भ प्रांत नागपूर महानगरच्यावतीने ‘सरल संस्कृत परीक्षा’ पुरस्कार वितरण सोहळा रविवार, 9 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता मुंडले प्लॅटिनम ज्युबिली सभागृह, टीबीआरए मुंडले विद्यालय, दक्षिण अंबाझरी मार्ग येथे आयोजित करण्यात आला आहे.
नागपूर महानगर द्वारे 14 डिसेंबर 2024 रोजी ही ‘सरल संस्कृत परीक्षा’ घेण्यात आली होती. या परीक्षेला नागपुरातील विविध शाळांमधून जवळजवळ 5500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जामदार विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप भराडे तर प्रमुख वक्ते म्हणून संस्कृत भारती विदर्भ प्रांतचे पूर्व मंत्री डॉ. संभाजी पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सं.भा. नागपूर महानगरचे अध्यक्ष विलास काळे राहणार असून विदर्भ प्रांत अध्यक्ष रमेश मंत्री व विदर्भ प्रांत मंत्री श्रीनिवास वर्णेकर यांची विशेष उपस्थिती राहील.
सर्व संबंधितांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगर मंत्री केतकी डांगे व विद्यालय प्रमुख कृष्णकुमार देशकर यांनी केले आहे.
















