सिकलसेल-थॅलिसिम‍िया जनजागरण अभियानाला प्रारंभ

0

सिकलसेल-थॅलिसिम‍िया जनजागरण अभियानाला प्रारंभ
लोककल्‍याण डायग्‍नोस्टिक्‍सचा सामाजिक उपक्रम

नागपूर (NAGPUR), 3 मे

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ लोकसमस्‍या संशोधन आणि लोककल्‍याण समिती संचालित लोककल्‍याण डायग्‍नोस्टिक्‍समध्‍ये 8 मे – थॅलिसिमिया दिवसाच्‍या अनुषंगाने समाजात जनजागृती करण्‍याच्‍या उद्देशाने सिकलसेल-‍थॅलिसिमिया जनजागरण अभियानाला प्रारंभ करण्‍यात आला.

गुलमोहर सभागृहात गुरुवारी झालेल्‍या या कार्यक्रमाला एम्‍सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी , डब्‍ल्‍यूसीएलचे सहप्रबंध निदेशक व अध्‍यक्ष जय प्रकाश द्विवेदी, निदेशक(मानव संसाधन) हेमंत पांडे, ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते दादाजी कोठे, लोककल्‍याण डायग्‍नोस्टिक्‍सचे अध्‍यक्ष डॉ. विजयकुमार तुंगार, लोककल्‍याण समितिचे अध्‍यक्ष डॉ. दिलीप गुप्ता यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी ‘सिकलसेल एनीमिया – थॅलिसिमिया जनजागरण अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्‍यात आले. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍हीडिओ संदेशाद्वारे अभियानाला शुभेच्‍छा दिल्‍या.

जयप्रकाश द्विवेदी यांनी डब्‍ल्‍यूसीएलचा 60 टक्‍के सीएसआर फंड आरोग्‍य क्षेत्रासाठी वापरला जातो असे सांगत लोककल्‍याण समितीला सर्वतोपरी मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले.

डॉ. प्रशांत जोशी म्‍हणाले, एम्‍समध्‍ये सिकलसेलसाठी स्‍वतंत्र सेल सुरू करण्‍यात आला असून रुग्णांवर येथे मोफत उपचार करण्‍यात येतात. बोनमॅरो लॅबदेखील सुरू करण्‍यात आल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. प्रास्‍ताविकातून विनय आंबुलकर यांनी लोककल्‍याण डायग्‍नोस्टिक्‍सद्वारे रुग्‍णांचे वैयक्तिक समुपदेशन करण्‍याचा प्रयत्‍न केला जात असल्‍याचे सांगत 2 ऑक्‍टोबर 2025 पर्यंत 1 लाख नागरिकांचे रक्‍त परीक्षण करण्‍याचे उद्दीष्‍ट आखण्‍यात आल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका राउत व पवन बावनकुळे यांनी केले तर आभार सचिव आनंद मुळे यांनी मानले.