

(Nagpur)नागपूर, 24 एप्रिल
एसबीकेएफ द्वारे आयोजित 11 व्या इंटरनॅशनल गेम्स अंतर्गत दुबई येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये नागपूरची श्रुती राठी गांधी 50 मीटर, 100 मीटर, व 200 मीटर बॅकस्ट्रोक या तीन प्रकारात सहभागी होणार आहे. दि. 24 व 25 एप्रिल 2025 रोजी दुबईत होत असलेल्या या स्पर्धेत श्रुती चाळीस वर्षावरील वयोगटामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे.
श्रुतीने सीपी क्लब नागपूर, नागपूर सुधार प्रन्यास व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग बेसा रोड, नागपूर येथील स्विमिंग पूल वर आंतरराष्ट्रीय स्विमिंग कोच डॉ. जयप्रकाश दुबळे व मंगेश गोखले यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव केला आहे.
श्रुतीने यापूर्वी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्विमिंग कॉम्पिटिशन तसेच स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. नुकत्याच 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित खुल्या जलतरण स्पर्धेत श्रुतीने सर्वोत्कृष्ट महिला जलतरणपटू बनण्याचा बहुमान पटकावलेला आहे.