

दुबईत पार पडली आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा
नागपूर (nagpur), 24 एप्रिल
एसबीकेएफ द्वारे आयोजित 11 व्या इंटरनॅशनल गेम्स अंतर्गत दुबई पार पडलेल्या इंटरनॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये नागपूरची श्रुती राठी गांधी हिने वैयक्तिक 100 मीटर, व 200 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावली तर 50 मीटर प्रकारात रजतपदक पटकावले आहे. या स्पर्धेत श्रुती गांधी यांनी चाळीस वर्षावरील वयोगटामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.
दुबईमध्ये 24 व 25 एप्रिल दरम्यान ही इंटरनॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन पार पडली. त्यात नागपूरकर श्रुती गांधीने चमकदार कामगिरी केली. श्रुतीने सीपी क्लब नागपूर, नागपूर सुधार प्रन्यास व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग बेसा रोड, नागपूर येथील स्विमिंग पूल वर घेतले असून त्यांनी या यशाचे श्रेय आंतरराष्ट्रीय स्विमिंग कोच डॉ. जयप्रकाश दुबळे व मंगेश गोखले यांना दिले आहे.
श्रुतीने यापूर्वी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्विमिंग कॉम्पिटिशन तसेच स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. नुकत्याच 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित खुल्या जलतरण स्पर्धेत श्रुतीने सर्वोत्कृष्ट महिला जलतरणपटू बनण्याचा बहुमान पटकावलेला आहे.