स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी मतदारांना सोयीच्या ठरतील अशी बुथ पुनर्रचना करा…माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे
नागभीड, (Nagbhid) :- नागभीड तालुक्यातील काही गावालगतच मतदान बुथ केंद्र असतांना दुरच्या गावात मतदान केंद्र दिल्याने , विधानसभा निवडणुकीत याबाबत नाराजी व तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून पुर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणूकीत लक्षात आलेल्या अशा मतदान बुथ केंद्राची फेररचना करण्याची मागणी संबंधित गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांच्या नेतृत्वात नागभीड चे तहसीलदार प्रताप वाघमारे यांना केली आहे.
तालुक्यात देवपायली व सोनुली खुर्द या दोन गावांची गटग्रामपंचायत आहे. दोन गावांमधील अंतर फक्त दीड किलोमीटर असतांना सोनुली गावातील मतदारांची नावे नजिकच्या देवपायली बुथवर न टाकता ती पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या राजोली बुथवर समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे सोनुली खुर्द येथील मतदारांची नावे राजोली बुथ (Rajoli) वरुन वगळून नजिकच्या देवपायली बुथवर समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तर निवडणूक प्रशासनातील गोंधळाचा कळस म्हणजे राजोली या गावात मतदान केंद्र असतांना या गावातील मतदारांना चक्क दोन किलोमीटर अंतरावरील बोंड येथील केंद्रावर मतदानासाठी जावे लागते. राजोली मतदान केंद्रात नवानगर (Navanagar) व सोनुली खुर्द या गावातील मतदार समाविष्ट आहेत. त्यामुळे राजोली च्या मतदारांची नावे बोंड येथुन वगळून राजोली बुथ वर समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बोंड गटग्रामपंचायत असुन यात बोंड , पारडी जाटीन, राजोली व नवानगर ही चार गावे अंतर्भूत आहेत. बोंड पासुन दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडी जाटीन या गावातील मतदारांची नावे चार किलोमीटर दुर अंतरावर असलेल्या देवपायली बुथ वर टाकण्यात आलेली आहेत. त्यामुळे देवपायली बुथ वरुन पारडी जाटीन येथील मतदारांची नावे वगळण्यात येऊन ती दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या बोंड येथील मतदान केंद्रात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आकापुर गटग्रामपंचायत मधील येनोली खुर्द येथील मतदारांना नजिकचा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता हा जंगलव्याप्त व मध्ये असलेल्या मोठ्या नाल्यावर वनविभागाच्या आडकाठीमुळे अजुनही पुल होउ न शकल्याने बाळापुर (बुज.) मार्गे ७ किलोमीटर अंतर कापत यावे लागते . त्यामुळे जंगलव्याप्त असलेल्या येनोली खुर्द येथील जवळपास २५० हुन अधिक असलेल्या मतदारांसाठी नविन मतदान केंद्र मंजूर करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. तसेच वासाळामेंढा गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वासाळामक्ता येथील मतदारांची नावे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या किटाडी मेंढा या बुथवर असल्याने ती तिथून वगळून नजिकच्या वासाळामेंढा मतदान केंद्रात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेली ही चुक येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी दुरुस्त करून मतदारांना सोयीची ठरतील अशी बुथ पुनर्रचना करुन मतदारांना दिलासा द्यावा अशी मागणी नागभीड चे तहसीलदार प्रताप वाघमारे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. निवेदन देतांना बोंड चे उपसरपंच जगदिश पाटील राऊत , कृऊबास संचालक धनराज ढोक , वासाळा मेंढा येथील भाजपा (BJP) बुथ प्रमुख व भाजयुमो तालुका उपाध्यक्ष नितेश कुर्झेकर व तालुका भाजपा महिला आघाडी महामंत्री कु. उज्वला माटे यांचा समावेश होता.
मुंबई (Mumbai) :- ओबीसी समाजाच्या बारा मागण्याचे निवेदन ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती ठेऊन शासन निर्णय महिनाभरात काढू, असे आश्वासन ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी...