


बुलढाणा (Buldhana)– एकदा विकलेली वस्तू दुकानदार पण परत घेत नाहीत,मातोश्री व महाविकास आघाडीचे सर्व पक्ष नरेंद्र खेडेकर यांच्या पाठीशी उभे आहेत. आम्ही अनेक वेळा एकटे असताना बुलढाण्यात विजय एक हाती मिळवला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या (ठाकरे गट) (Thackeray group)उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज बुलढाण्यात दिली.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आज निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता सुषमा अंधारे या बुलढाण्यात आल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, यावेळेस आमच्या सोबत आमचे इतर मित्रपक्ष देखील महाविकास आघाडीत असल्याने विजय निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 25 पैसे विकास आणि 75 पैसे भ्रष्टाचार असं समीकरण या जिल्ह्यात राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.