
बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरिपाची तब्बल सात लाख 40 हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. मात्र गेल्या काही काळात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने मोठा घाला घातलेला आहे. त्याची मदत अद्याप हजारो शेतकऱ्यांना मिळाली नाही, पिक विम्याचे पैसे मिळाले नाही. ही संपूर्ण मदत शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज विनाअट, विनाशर्त उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी आज ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची कुठल्याच प्रकारची अडवणूक होणार नाही याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणी देखील ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे