शिवसेना उ.बा.ठा. पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन

0
शिवसेना उ.बा.ठा. पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन
Shiv Sena U.Ba.tha. Protest movement on behalf of the party

नाशिक:- बदलापूर (Badalapur child abuse) मध्ये चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे.बदलापूर मधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपाशी संबंधित आहे.या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहे.याप्रकारे महाराष्ट्रात भ्रष्ट युती सरकार विरोधात शिवसेना उबाठा ने निषेध आंदोलन करण्यात आले.आंदोलनात शालेय विद्यार्थीनी सहीत जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोदंवला..

नाशिक जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यामुळे आज नाशिक शिवसेना राज्यातील महिला वरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिलांना सुरक्षित करण्यासाठी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शालिमार चौक नाशिक येथे हे आंदोलन करण्यात आले.सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर,शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे,माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, योगेश घोलप, डी.जी.सुर्यवंशी, निवृत्ती जाधव, मनोहर मेढे, केशव पोरजे, जगन आगळे, देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, व अन्य पदाधिकाऱी सहभागी झाले होते.