

महाराष्ट्र (Maharashtra) :- शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश इखार विधानसभेच्या रिंगणात उतरणार देवळी पुलगाव विधानसभा शिवसेना लढवणार . मागील दहा वर्षापासून देवळी पुलगाव वर्धा विधानसभेचे पक्षाचे नेतृत्व करणारे वर्धा जिल्हाप्रमुख गणेश इखार देवळी पुलगाव विधानसभा लढवणार असे पक्षश्रेष्ठींचे कडून आदेश आलेले आहे शिवसेनेचे कार्य बघता जागोजागी शाखेचे बांधणी करण्यात आलेली आहे व देवळी शहर येथे प्रचार कार्यालय सुद्धा उद्घाटन आमदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तेथे पत्रकार परिषदेत त्यांनी आदेश दिला की मागच्या वेळेस शिवसेनेला ही जागा सुटली होती त्याचप्रमाणे ह्या वेळेस पण शिवसेना पूर्ण ताकतीनिशी विधानसभा लढवणार व मागील गलती जी झाली ती आता करणार नाही कारण की मागच्या वेळेस राजेश बकाने यांनी निर्दिलीय फॉर्म भरून शिवसेनेचे भाजपाचे मत डिव्हायडेशन केले होते.
आता कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेत राहण्यासाठी बगावत होणार नाही याची काळजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) साहेब घेत असून पक्षाला मजबूत करण्यासाठी जिल्हाप्रमुख गणेश इखार यांना पक्षश्रेष्ठींनी पूर्ण विधानसभा क्षेत्र, देवळी पुलगाव विधानसभेमध्ये चे सहा आणि हिंगणघाट विधानसभेचे दोन जिल्हा परिषद सर्कल यांची सर्व बांधणी जोमात सुरू करण्याचे आदेश दिले.
शिवसेना पूर्ण मजबुतीने विधानसभा लढवणार असे आश्वासन आमदार भावना गवळी यांनी दिले व गणेश इखार यांना पूर्ण विधानसभा पिंजून काढण्याचे आदेश दिले व त्यांनी काम सुद्धा सुरू केलेले आहे एक महिन्यांमध्ये वातावरण सुद्धा भगवामय झालेले आहे व जिकडेतिकडे शिवसेनेचे व शिवसेनेने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे गोरगरिबांसाठी लाडक्या बहिणीसाठी 1500रुपये महिना, वर्षाला तीन सिलेंडर भावासाठी व शेतकऱ्यांसाठी जे अनुदान उपलब्ध करून दिले त्या कारणाने देवळी पुलगाव विधानसभेमध्ये शिवसेनेने जागा लढवावी, तेथील कार्यकर्ते सुद्धा कामाला लागलेले आहेत.
मागील 25 वर्षापासून काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे हे निवडून येत आहे पण जिल्ह्यात सर्वात खराब परिस्थिती आहे, कारण तिथला आमदार हैदराबादला चार वर्ष आणि वर्धेला एक वर्ष असतो,त्याचा चेहरा दिसत नाही असे लोकांचे म्हणणे आहे. यावेळेस शिवसेना आपला आमदार निवडून आणणार असे सर्व कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहे. काही दिवसातच मंत्री महोदय व त्यानंतर मुख्यमंत्री साहेब मेळावा घेणार आहे. शिंदे साहेब स्वतः या विधानसभेकडे लक्ष देत आहेत, गणेश इखार ह्यावेळेस पूर्ण ताकतीने शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तळमळ धावपळ करत आहेत