

*शिवसेनेची वंचित परिवाराला मिष्ठान व फराळ वाटप करून दिवाळी भेट*
शहरातील विविध भागात राबविण्यात आला उपक्रम
वर्धा(Wardha) :शिवसेना प्रणित महिला आघाडीच्या वतीने शहरातील मागास भागात राहणाऱ्या परिवारास दिवाळी भेट निमित्याने मिष्ठान व फराळाच्या किटचे वाटप करण्यात आले.वंचित परिवाराची दिवाळी साजरी व्हावी म्हणून शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी ठमेकर यांच्या पुढाकाराने गरजू,गरीब व वंचित परिवाराला दि. १५ ऑक्टोबर रोजी लेंडीपुरा परिसरातील गरजू,गरीब व वंचित परिवाराला दिवाळी भेट म्हणून मिष्ठान व फराळाचे कीट वाटप करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
वंचितांना दिवाळी भेट म्हणून मिष्ठान व फराळ वाटप दि. १५ ते १८ आक्टोबर दरम्यान सतत चार दिवस राबविण्यात आले असून शहरातील शिवाजी पेठ,स्टेशन फैल,दयालनगर परिसर,बुरड मोहल्ला,पूल फैल,तार फैल, शिवनगर,हनुमान नगर,जाकीर हुसेन कॉलनी परिसरातील परिवारांना वाटप करून समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा समन्वयक अनिल देवतारे,कामगार नेते प्रशांत रामटेके,शहर प्रमुख शार्दूल वांदिले,बादल श्रीवास्तव,समीर खान,विजय कंगाले,विवेक अतकर, युद्धिष्टीर थोरात,धनश्री थोरात,संजय बल्लाळ,कैलास कोळे, सुनीता पंढरे, संजय देवतारे,नरेश बोन्दरे, मनोज कोटंबकर,प्रज्वल वाटकर,कोमल येणुरकर,धनु मानकर,सोनाली गोलाई,सृष्टी पाचे,सुबोध रामटेके
प्रमोद बिडकर सह असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.