

केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने शारदोत्सवात मेहंदी रेखाटनाचा उपक्रम घेण्यात आला. त्याला पूर्व, पश्चिम, उत्तर, मध्य, दक्षिण-पश्विम, दक्षिण अशा सहा विधानसभा क्षेत्रातील 409 मंडळांनी सहभागी होत 42,200 हातांवर मेहंदी रेखाटली.
कला, साहित्य, संस्कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजित या उपक्रमात संयोजिका मनिषा काशीकर यांच्या मार्गदर्शनात शहराच्या विविध भागातील मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शारदादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांनी आपल्या हातांवर मेहंदी रेखाटून घेत उत्सवात रंग भरले.
शहरातील नामांकित मेहंदी कलाकारांसह हौशी कलाकार या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रगती पाटील, कविता सरदार, मनोरमा ताई, सिमरन कौर, वर्षा चौधरी, अश्विनी डबली, संतोष लढ्ढा, मनिषा कोठे, निशा भोयर, वैशाली फुलझेले, ज्योती देवघरे , प्रिती राजदेरकर, दिपाली ढोमणे, सारिका नांदूरकर, अनिता काशीकर, रेखा निमजे, डॉ. सरिता माने, आशा गुप्ता असे अनेकांचे सहकार्य लाभले.